भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 28 धावा केल्या असून 171 धावांची आघाडी घेतली आहे. तर इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला.
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला अश्विन पहिला पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर यशस्वी जैस्वालने पहिले द्विशतक पूर्ण केले. या द्विशतकासह, यशस्वी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक 209 धावा करणारा फलंदाज बनला आहे. यशस्वीने अँडरसनच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला बेअरस्टोने झेलबाद केले. भारताचा पहिला डाव 396 धावांवर संपला.
गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने इंग्लिश फलंदाजांचे कंबरडे मोडले आणि शानदार 6 विकेट्स घेतल्या. सुरुवातीला बेन डकेटच्या रूपाने कुलदीप यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली आणि संघाची पहिली विकेट 59 धावांवर पडली. यानंतर अक्षर पटेलने जॅक क्रॉलीला 76 धावांवर श्रेयस अय्यरकडे झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
यानंतर जसप्रीत बुमराहने ऐतिहासिक स्पेल करत इंग्लिश फलंदाजांना अडचणीत आणले. सर्वप्रथम त्याने आपल्या स्विंगच्या जोरावर जो रुटला 50 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, त्याने 23 च्या वैयक्तिक स्कोअरवर ऑली पोपला उत्कृष्ट यॉर्करसह पाचव्यांदा बाद केले.
बुमराहने पुन्हा एकदा पुनरागमन करत कर्णधार बेन स्टोक्सला 47 धावांवर क्लीन बोल्ड केले. यानंतर त्याने या सामन्यात टॉम हार्टलीची 21 धावांत विकेट घेत 5 बळी घेतले. शेवटी बुमराहने 6 धावांवर अँडरसनची विकेट घेतली आणि इंग्लंडचा डाव 253 धावांवर संपवला. त्यामुळे आता भारताला 143 धावांची आघाडी मिळाली आहे.