पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून आज ते गुवाहाटी इथे विकासकामांची पायाभरणी, विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पोचले आहेत. यावेळी गुवाहाटी येथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी भव्य रोड शो केला. या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. हजारोंच्या संख्येने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले स्थानिक त्यांच्या नावाचा मोठ्याने जयघोष करत होते.
आज गुवाहाटीमध्ये पंतप्रधान मोदी 11,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि विकासकामांची पायाभरणी करणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाही हे देखील यावेळी उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुवाहाटीमध्ये एका जनसभेला संबोधित केले आहे.
पंतप्रधान लवकरच ज्या प्रमुख प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत, त्यात मां कामाख्या दिव्य परियोजन (मा कामाख्या ऍक्सेस कॉरिडॉर) यांचा समावेश आहे, ज्यांना पूर्वोत्तर क्षेत्रासाठी पंतप्रधान विकास पुढाकार (PM-DevINE) योजनेंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. हे कामाख्या मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवेल.
“पंतप्रधान 3400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रस्ते सुधारणा प्रकल्पांची पायाभरणी करतील, ज्या अंतर्गत दक्षिण आशिया उपप्रादेशिक आर्थिक सहकार्य (SASEC) कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीचा एक भाग म्हणून 38 पुलांसह 43 रस्ते अपग्रेड केले जातील. पंतप्रधान दोन उद्घाटन करतील. डोलाबारी ते जमुगुरी आणि विश्वनाथ चारियाली ते गोहपूरअश्या 4-लेनिंग प्रकल्पांचा समावेश आहे. .हे प्रकल्प इटानगरशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करतील आणि या प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देतील
या प्रदेशातील प्रचंड क्रीडा क्षमतेचा उपयोग करण्याच्या दृष्टीकोनातून, पंतप्रधान राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पांमध्ये चंद्रपूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा स्टेडियम आणि नेहरू स्टेडियमचे अद्ययावतीकरण यांचा समावेश आहे.
.
याशिवाय, गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची नवीन इमारत, करीमगंज जिल्ह्यातील रताबारी इथं नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि गुवाहाटीमधील युनिटी मॉलची पायाभरणी देखील मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
काल गुवाहाटी इथे दाखल झालेल्या पंतप्रधानांचे पारंपारिक नृत्यप्रकार सादर करत, जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.