भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच ६ गोळ्या झाडल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे आणि त्या प्रकरणात गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोन आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावर काल सुनावणी पार अडली असून उल्हासनगर न्यायालयाने आमदार गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मात्र आज आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढणार अशी शक्यता निर्माण झाली आहे कारण आता त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा शेतकऱ्यांनी दाखल केला असून आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार गणपत गायकवाड यांनी 31 जानेवारी रोजी दुपारी 1.00 वाजेता जातीवाचक शिविगाळ केलीअसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे . त्यामुळे त्यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीता एकनाथ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, 31 जानेवारी रोजी गणपत गायकवाड आणि इतरांनी आमच्या जागेवर कंपाउंड करण्याचे काम सुरु केले होते त्याबाबत आम्ही त्यांना जाब विचारलाअसता आमदार गणपत गायकवाड यांनी आम्हास मारण्यासाठी फावड्याचा दांडका उचलला. तसेच जातीवाचक शिविगाळ करत तुम्ही तुमच्या जमिनीकरीता कोणत्याही कोर्टामध्ये जा, आम्ही ती घेऊच अशी दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
दरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात महत्वाची घोषणा केली आहे.या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येईल, असा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला आहे आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे.