सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे संसदेचे शेवटचे अधिवेशन आहे. संसदेच्या अधिवेशनाची सुरूवात राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. त्यानंतर १ तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले होते.
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कनिष्ठ सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. या संदर्भात पक्षाने सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.
याशिवाय, दिवसभराच्या सभागृहातील कामकाजाच्या यादीनुसार लोकसभा खासदार रवनीत सिंग आणि रामशिरोमणी वर्मा सभागृहाच्या बैठकीतील सदस्यांच्या अनुपस्थितीवरील समितीच्या बाराव्या बैठकीचे इतिवृत्त टेबलवर ठेवतील. खासदार पीपी चौधरी आणि एनके प्रेमचंद्रन ‘प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक दशतवादाचा सामना’ या विषयावर परराष्ट्र व्यवहार समितीचा २८ वा अहवाल सादर करतील.
भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे कोशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाशी संबंधित ‘प्रशिक्षण’ महासंचालनालयाच्या कामकाजाबाबत’ कामगार, वस्त्रोद्योग आणि कौशल्य विकास विषयक स्थायी समितीच्या 49 व्या अहवालात समाविष्ट असलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत संसदेत माहिती देतील. यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन एप्रिल-