परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आळंदी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ. मोहन भागवत हे उपस्थित होते. डॉ. मोहन भगवंतांच्या हस्ते या अमृत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परमपूज्य स्वामी गोविंद गिरी महाराज आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान स्वागत समितीचे अध्यक्ष श्री. राजेशजी मालपानी यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे स्वागत केले. दरम्यान, सतत प्रयत्न करणे, पुरुषार्थ करणे आणि त्याचे काय फळ काय मिळणार हे देवाकडे सोपवणे हेच आपले काम आहे असे डॉ. मोहन भागवत म्हणाले.
स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, ”आज माझ्या मनाला खूप आनंद झाला आहे. माझ्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त हा उत्सव होत आहे यामुळे मला आनंद झाला नसून, हा पूर्ण कार्यक्रम देशविदेशातील ५०० कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे. त्याबद्दल मला अत्यंत आनंद झाला आहे. आपल्या देशामध्ये अनेक विदेश आक्रमक आले. त्यांनी आपल्या देशातील अनेक मंदिरे तोडली. आक्रमकांनी जो अपमान केला आहे त्याची चिन्हे मिटली गेली पाहिजेत. यासाठी सर्वानी सहयोग दिला आहे. भविष्य चांगल्या पद्धतीने जगायचे असेल तर पूर्वीच्या घटना विसरून जाणे आवश्यक आहे. चांगल्या वातावरणामध्ये संस्कार आपोआप होतात. भगवंताची भक्ती, जीवनमूल्य, ज्ञानाचे, अधिष्ठानाचे वातावरण निर्माण केले तर पुढील पिढी संस्काक्षम होईल.”
त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपले विचार मांडले. यावेळी ते म्हणाले, ”ज्यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त हा महोत्सव होत आहे असे श्रध्येय गोविंदगिरी महाराज, श्रद्धेय राजेंद्रदास महाराज, श्रद्धेय स्वामी प्रणवानंद महाराज, श्रद्धेय लोकेश मुनीजी, श्रद्धेय मारुतीबुवाजी, श्रद्धेय सदानंदजी महाराज आणि सर्व उपस्थित संतगण, नागरिक, माता भगिनी आणि कार्यकर्ते. आजचे सगळे आयोजन बघून मला असे वाटत की हे आयोजन केले गेले नसू, हे घडत आहे. हे आयोजन होणे ही नियतीची योजना आहे. सतत प्रयत्न करणे, पुरुषार्थ करणे हे आपले काम आहे. केलेल्या कष्टांचे फळ काय, कसे मिळेल हे देवाकडे सोपवायचे आहे. सध्या जे देशामध्ये घटना घडत आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांचे सततचे प्रयत्न आणि पुरुषार्थ यामुळेच घडत आहेत. म्हणूनच ‘हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा’ असे छत्रपती शिवाय महाराजांनी आपल्या सहकार्यांना सांगितले. म्हणून डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी आपल्या स्वयंसेवकांना कायम सांगितले की आपले कार्य हे ईश्वराचे कार्य आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की, यात यश मिळणे निश्चित आहे. यामुळे सतत प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे हा याचा दुसरा अर्थ आहे. श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे भारत देशातील सर्वसामान्यांमध्ये असलेला गुणाचे हे या देशाचे भाग्य आहे,”
स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त आळंदीमध्ये महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, गीता परिवार, श्रीकृष्ण सेवा निधी, श्री संत ज्ञानेश्वर संत संकुल यांच्या वतीने गीता भक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या मनोगतामध्ये स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.