झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून चंपाई सोरेन यांनी शपथ घेतली होती. आज सोरेन सरकारचा विश्वासदृश ठराव विधानसभेत पार पडला. आजचा विश्वासदर्शक ठराव चंपाई सोरेन सरकारने जिंकला आहे. म्हणजेच झारखंड विधानसभेत सोरेन सरकारने आपले बहुमत सिद्ध केले आहे. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अटक केली आहे. सध्या त्यांना ५ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलाय आहे. मात्र रांची येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे हेमंत सोरेन आजच्या विश्वासदर्शक ठरावासाठी उपस्थित राहिले होते.
चंपाई सोरेन यांनी २ फेब्रुवारी रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाची व गोपनीयतेची शपथ दिली होती. हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता. त्यानंतर चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यपालांनी चंपाई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी दिला होता. दरम्यान आजचा विश्वासदर्शक ठराव हा चंपाई सोरेन सरकारने ४७ विरुद्ध २९ या फरकाने जिंकला.
दरम्यान, आज विश्वासदर्शक ठरावाची ईडी अटकेत असलेले हेमंत सोरेन हे देखील उपस्थित राहिले होते. ईडीने घेतलेल्या तीव्र आक्षेपानंतरही रांची येथील विशेष न्यायालयाने हेमंत सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावामध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. ईडीने सोरेन यांना झारखंडमधील मनी लॉन्डरिंग प्रकरणामध्ये अटक केली आहे. मला झालेली अटक ही बेकायदेशीर असून, मला यातून दिलासा द्यावा अशी याचिका सोरेन आणि सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र सुप्रीमकोर्टाने याचिका ऐकण्यास नकार देत झारखंड हाय कोर्टात दाद मागण्यास सांगितले.