लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला. या आधी भरपूर राजकीय नेत्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पण त्यापैकी एक असे अडवाणी यांना मिळालेल्या भारतरत्नचे स्वरूप नाही.
कारण अडवाणी यांनी भारतीय प्रशासनातील सर्वोच्च पद कधी अंगिकारले नाही. तसेच विशिष्ट राजकीय गरजेपोटी त्यांना हे पद, पुरस्कार मिळालेला नाही. त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे कारण अडवाणी हे भारतीय राजकीय संस्कृतीला ३६० अंश कोनातून बदलले आहे. व या path breaking change साठी भारतरत्न पुरस्कार अडवाणी यांना जाहीर झाला आहे.
अडवाणी यांनी भारतीय राजकीय संस्कृतीमध्ये असा कोणता बदल घडवून आणला व त्यासाठी त्यांनी काय काय सोसले? व तो बदल कसा कायमस्वरूपी झाला यामध्ये या पुरस्काराचे कारण दडलेले आहे. अडवाणी यांनी १९४७ सालापासून भारतीय राजकारणात अत्यंत अस्पर्श, अस्पृश्य ठरवली गेलेली गोष्ट केली. बहुसंख्येने असलेल्या हिंदू समाजाच्या सांस्कृतिक भुकेला भारतीय राजकारणात मध्यवर्ती आणले. बौद्धिक दहशतवादी व बौद्धिक दहशतवाद या आधारे बहुसंख्यांक समाज, त्याचा विचार, त्याच्या सांस्कृतिक भुका या त्याज्य ठरवून त्या धार्मिक उन्माद या गटात टाकल्या गेल्या होत्या व फक्त अल्पसंख्याकांच्या भावना मात्र सेक्युलर ठरवल्या जात होत्या. त्यावेळी अडवाणी यांनी ही वैचारिक लढाई राजकीय क्षेत्रात एकहाती लढली व जिंकून दाखवली. सर्व जगाला भारतीय राजकीय क्षेत्रातील वैचारिक लढाई व त्याची उच्चतम गुणवत्ता अडवाणी यांनी दाखवून दिली. मंदिर या प्रश्नावर राजकीय रथयात्रा आणि ती पक्षाच्या चिन्हावर काढली. सर्व राजकीय परिप्रेक्ष त्यामुळे हादरलं. धार्मिक विषय राजकीय पटलावर? शांतं पापं.
त्यांच्या या कर्तृत्वासाठी हा सन्मान आहे. भारतीय राजकीय पटलावर त्यांनी हिंदू शब्द चर्चेत आणला. अल्पसंख्याक होते, जाती होत्या, पंथ होते पण हिंदू शब्द मात्र भारतीय राजकारणाला सोवळा होता. तो अडवाणी यांनी केंद्रबिंदू केला. भारतीय राजकारणात हिंदू शब्द अपरिहार्य बनवला व पक्षीय राजकीय समजूत ही तत्वाधिष्टित बनवली. स्वातंत्र्योत्तर भारतात हे काम अडवाणी यांनी केले. त्यांनी ज्याला तोड नाही अशी संकल्पना भारतीय राजकारणात आणला Psuedo Secularism, छद्म धर्मनिरपेक्षता.
भारतीय राजकारणाला जी मिती नव्हती, सांस्कृतिक, ही अडवाणी यांनी भारतीय राजकारणाला दिली. म्हणून हा भारतरत्न सन्मान!
आता आपण हिंदू शास्त्र, इतिहास, विज्ञान, आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा हे सर्व जे राजकीय क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात पहात आहोत याचे क्षेय अडवाणी यांना जाते कारण त्यांनी सांस्कृतिक गरजा या प्रथम जोरदारपणे राजकीय पटलावर आणल्या. त्यासाठी या वैचारिक दहशदवाद्यांचे हल्ले सोसले, जागतिक टीका सोसली पण यशस्वी होऊन थांबले. शासकीय प्रमुखाने राममंदिराची निर्मिती आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. हे अडवाणी यांचे कर्तृत्व भारतरत्न सन्मानाची शोभा वाढवत आहे.
आज खरंच अभिमान वाटतो. अडवाणी यांचे कौतुक वाटते, मनापासून अभिनंदन करावेसे वाटते. भारतीय अस्मितेचा, संस्कृतीचा, विश्वसंचाराचा आज सत्कार होत आहे.
त्रिवार अभिनंदन!
सुनील देशपांडे
सौजन्य ,विश्व संवाद केंद्र,पुणे