सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे संसदेचे शेवटचे अधिवेशन आहे. संसदेच्या अधिवेशनाची सुरूवात राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. त्यानंतर १ तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर संसदेत उत्तर देत आहेत. दरम्यान त्यांनी आपल्या भाषणातून त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.