पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (5 फेब्रुवारी) संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला (लोकसभा) संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसच्या दुकानाला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
पीएम मोदी म्हणाले, “काँग्रेसला चांगला विरोधक बनण्याची मोठी संधी मिळाली आणि 10 वर्षे कमी नाहीत. पण 10 वर्षातही ती जबाबदारी पार पाडण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले. जेव्हा ते स्वतः अपयशी ठरले तेव्हा विरोधी पक्षात अधिक आशावादी लोक होते पण त्यांनाही उदयास येऊ दिले नाही. तेच प्रोडक्ट पुन्हा-पुन्हा लाँच केल्यामुळे काँग्रेसच्या दुकानाला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे.”
एकच प्रॉडक्ट काँग्रेसकडून वारंवार लॉन्च करण्यात आले आहे. त्यांच्या घराणेशाहीमुळं देशाचे नुकसान झाले आहे. तसेच काँग्रेस सध्या ‘कॅन्सल संस्कृती’मध्ये फसली आहे, अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली आहे.