भाजपने सुशासन महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव 2 दिवस असणार असून याचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा करणार आहेत. तसेच या महोत्सवामध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मंडवीय, जम्मू-काश्मीरचे एनडी मनोज सिन्हा आणि तीन राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.
हा सुशासन महोत्सव येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या महोत्सवात आसाम, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे वाइस चेअरमन विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हिमंत बिस्वा सरमा आणि मोहन यादव हे जनपथ रोडवर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये स्वायत्त चॅरिटेबल ट्रस्ट रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून आयोजित सुशासन महोत्सवाला संबोधित करणार आहेत.
या महोत्सवात केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा सहभागी होणार आहेत. सोबतच अनेक मंत्री आणि खासदार देखील सहभागी होणार आहेत.
सगळ्याच सरकारांचे इरादे हे चांगले असतात. पण प्रत्यक्षात जमिनीवर योजनांची अमलबजावणी अयशस्वी होताना दिसते. त्यामुळे सध्या देशात योजनांची अमलबजावणी खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तसेच गव्हर्नेसबद्दल माहिती देणे हा या सुशासन महोत्सवाचा उद्देश आहे.
हा महोत्सव दोन दिवसांचा असून यामध्ये एका पुस्तकाचे विमोचन होईल. भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा पुस्तकाचे विमोचन करतील. ‘The Art of implementation: as mastered by PM Narendra Modi’ असे या पुस्तकाचे नाव आहे. यामध्ये विनय सहस्त्रबुद्धे आणि मुकुल प्रियदर्शी यांनी संपादन केलेल्या लेखांचे संकलन आहे.