ईडीने बंगालमध्ये अनेक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केल्याचे वृत्त समोर येत आहे. ‘मनरेगा’ घोटाळ्याशी संबंधित ईडीने पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १०० दिवसांच्या कामांतर्गत केंद्रीय निधीवर कोलकात्याच्या रेड रोडवर धरणे दिल्यानंतर ईडीने छापेमारी केली आहे. ईडीने संशयास्पद ईडीने मुर्शिदाबादमधील नौदा ग्रामपंचायतीच्या खाते विभागात काम करणाऱ्या रथींद्रनाथ डे यांच्या घरावर छापेमारी केली आहे.
ईडीने संशयास्पद मुर्शिदाबादमधील नौदा ग्रामपंचायतीच्या खाते विभागात काम करणाऱ्या रथींद्रनाथ डे यांच्या घरावर छापेमारी केली आहे. आतापर्यंत झारग्राममधील सरकारी अधिकाऱ्याच्या निवासस्थानावर, हुगळीच्या चुंचुरा येथील एका व्यावसायिकाचे घर आणि मुर्शिदाबादमधील एका जागेची झडती सुरू आहे. सॉल्ट लेकमधील जागेचाही शोध सुरू आहे. ईडीने एकाच वेळी चार जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, धनेखली आणि मुर्शिदाबाद पोलिस ठाण्यात भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.पश्चिम बंगालमधील राज्य भाजपाने यापूर्वी ममता बॅनर्जी सरकारवर मनरेगा योजनेअंतर्गत सरकारला देण्यात आलेल्या निधीच्या खर्चावर “भ्रष्टाचार आणि अनियमितता” केल्याचा आरोप केला होता.
बंगालमधील राज्य भाजपाने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने मनरेगा योजनेचा निधी थांबवला. त्यात म्हटले आहे की खोट्या याद्यांखाली तयार केलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले जात होते आणि केंद्रीय तपासणीत अनियमितता आढळल्यानंतर केंद्राने राज्य सरकारला पैसे वसूल करण्यास सांगितले होते.