पुणे शहराला टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. यामुळे शहरावर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. धरणांत पाणीसाठा कमी झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट उभे राहिले आहे. येत्या गुरुवारी शहरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याअंतर्गत तातडीची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. सहकारनगर, गुलटेकडी, कोंढवा, कात्रज आणि धनकवडी येथील भागांत गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पुण्यात यंदा पाण्याचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडला नाही. पुण्याला पाणीपुरवठा करणारी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणसाखळी १०० टक्के भरली नाहीत. यामुळे यंदा पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. पाण्याचा वापर देखील योग्य प्रमाणात करावे लागणार आहे.