उत्तरप्रदेशातील बागपत येथे लाक्षागृह आणि कब्रस्तान असा वाद 1970 पासून सुरू होता. तब्बल 53 वर्ष जुन्या वादावर आता सत्र न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निर्णय दिला आहे. पुरातत्त्व संशोधनातील पुरावे ग्राह्य धरत कोर्टाने हे ठिकाणी कब्रस्तान नसून लाक्षागृह असल्याचे मान्य केले आहे .
बागपत येथई सत्र न्यायालयात मुकीम खान व अन्य काही याचिकाकर्त्यांनी केस दाखल करत दावा केला होता की, ही जमीन कब्रस्तानची आहे. यावर 1970 पासून खटला सुरू होता. त्यानंतर हा खटला 1997 मध्ये बागपतकडे स्थानांतरित करण्यात आला. आता 53 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल हिंदूंच्या बाजुने लागला आहे. आपल्या निकालात कोर्टाने म्हटले की, हे कोणतेही कब्रस्तान नव्हे तर लाक्षागृह आहे आणि हे महाभारत कालीन आहे. घटनास्थळी जे प्राचीन शिलालेख मिळाले आहेत, त्यातून हे स्पष्ट होते की, हे कब्रस्तान नाही.
जेव्हा मुगल येथे आले व त्यांनी तोडफोड करून आपल्याला हवी तशी ठिकाणे बनवली. प्राप्त पुराव्यानंतर कोर्टाला समजले की, येथे कोणतेही कब्रस्तान नाही. ही 108 बीघा म्हणजेच सुमारे 5 एकर जमीन आहे. येथे एक उंच टेकडी आहे. येथे पांडव आले होते. त्यांना जिवंत जाळून मारण्यासाठी एक लाखामंडप बनवला गेला होता. रेवेन्यू कोर्टातही लाखामंडपाची नोंद आहे.