काही दिवसांपूर्वी मनोरंजन क्षेत्रामध्ये अनिल कपूर, हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा फायटर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा एक किसिंग सिन दाखवण्यात आला आहे. फायटर या चित्रपटामध्ये हा सीन करताना हृतिक रोशनने भारतीय वायुसेनेच्या गणवेश परिधान केला आहे. त्यामुळे आता त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
भारतीय वायुसेनेच्या आसाममधील अधिकारी सौम्य दीप दास यांनी फायटर चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध नोटीस जारी केली आहे. ज्यात त्यांनी हा सीन म्हणजे भारतीय वायुसेनेच्या अपमान असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटाची कथा जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेल्या रोशन) आणि प्रज्ञा (पादुकोण) या दोन दिग्गज फायटर पायलटभोवती फिरते. दहशतवादी हल्ल्यानंतरच्या घटनांमधून ही कथा तयार झाली आहे. कथा जसजशी पुढे सरकते तसे ते दोघेजण प्रेमात पडतात. याबाबतचे वृत्त इंडिया टुडे ने दिले आहे.
हा चित्रपट २०१९ मधील पुलवामा हल्ला, २०१९ मधील बालाकोट हवाई हल्ला आणि २०१९ मधील भारत-पाकिस्तान सीमा संघर्ष याच्यावर आधारित आहे. ज्यात अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहे. ‘फायटर’ चित्रपट हा सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट रॅमन चिब यांच्यासोबत लिहिलेल्या कथेवर आधारित आहे. Viacom18 Studios आणि Marflix Pictures या चित्रपटाचे निर्माते आहेत.