राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाले आहे. याबाबतचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग मोकळा केल्याने आता आमदार अपात्रतेचा निर्णयही अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवार गटाचाच असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे सध्या अजित पवार गटाकडून मोठा जल्लोष केला जात आहे.