अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. याबाबतचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. तर आता शरद पवार गटाने निश्चित केलेली पक्ष आणि चिन्हांची नावे समोर आली आहेत.
निवडणूक आयोगाने शरद पवारांना सांगितले की, शरद पवार त्यांचा नवा पक्ष स्थापन करण्यासाठी आयोगाला कोणतीही चार नावे देऊ शकतात. त्यासाठी शरद पवार गटाला आयोगाने दुपारी चार वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.
अशातच आता शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पक्ष आणि चिन्हांची नावे समोर आली आहेत. यामध्ये मी राष्ट्रवादी, शरद पवार काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष ही तीन पक्षाची नावे म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. तर उगवता सूर्य, कपबशी, सूर्यफूल आणि चष्मा ही चार नावे चिन्हासाठी निश्चित करण्यात आली आहेत.
दरम्यान, आता शरद पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हांची नावे निश्चित झाल्यामुळे आता यातील कोणते नाव निश्चित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.