काल अखेर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तसेच शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देण्याची आज दुपारी ४ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह अधिकृतरित्या अजित पवार गटाला मिळाले आहे. मात्र शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या गटाला दिले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे हा निर्णय आल्यानंतर शरद पवार गटाने हे स्पष्ट केले की आम्ही या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. त्यानुसार आज शरद पवार गटाच्या वकिलांची महवताची बैठक पार पडणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबतची आणि आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांची राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. पुढील काही दिवसांमध्ये त्या प्रकरणाचा देखील निर्णय येण्याची शक्यता आहे.
राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आले आहे.निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग मोकळा केल्याने आता आमदार अपात्रतेचा निर्णयही अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.