सध्या हॉलिवूड जगतातून खूप वाईट बातमी समोर आली आहे. आपल्या गायनाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा गायक टोबी कीथ यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 62 व्या वर्षी टोबी किथ यांच्या निधनाने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. असे सांगण्यात येत आहे की टोबी कीथ दीर्घकाळापासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होते आणि गेल्या सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
टोबी कीथ अमेरिकन पॉप स्टार म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या गाण्याच्या कारकिर्दीत टोबी किथ यांनी उत्तम गाण्यांनी सर्वांचे मनोरंजन केले आहे. अशा परिस्थितीत किथ यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टोबी कीथ यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून देण्यात आली आहे.
या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अत्यंत दु:खाने सांगावे लागत आहे की, आमचे लाडके टोबी कीथ यांनी 5 फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या जीवनाची लढाई मोठ्या हिमतीने आणि संयमाने लढली आहे.
या दुख:द घटनेनंतर प्रत्येकजण सुरांचा राजा टोबी किथ यांना श्रद्धांजली वाहत असून त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहे. टोबी कीथ यांच्यासाठी पोटाचा कर्करोग घातक ठरला आहे. अनेक वर्षांपासून ते उपचार घेत होते.
90 च्या दशकात ‘शुड हॅव बीन अ काउ बॉय’ या गाण्याने गायनाच्या दुनियेत पदार्पण करणाऱ्या टोबी कीथ यांनी गीतकार म्हणूनही आपला ठसा उमटवला. इतकेच नाही तर त्यांनी अभिनय क्षेत्रातही पदार्पण केले होते, पण त्यांना संगीत क्षेत्राप्रमाणे या क्षेत्रात यश मिळाले नाही.