येत्या काही महिन्यांमध्ये देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी एनडीए सरकारने आणि विरोधात असलेल्या सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा काहीही करून मोदी स्कारकर पुन्हा सत्तेत येणार नाही यासाठी सर्व विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडीची स्थापन केली आहे. मात्र त्यातील अनेक पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे इंडिया आघाडीचे नक्की काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीआधी दक्षिणेतील तामिळनाडू राज्यातून भाजपासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. तामिळनाडूमधील १५ माजी आमदार आणि १ माजी खासदार यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला आहे.
संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता जनता आणि विरोधी पक्ष ‘अब की बार ४०० सो पार’ म्हणत असल्याचे म्हणाले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर ”जगातील सर्वात मोठ्या पक्षात आपले स्वागत आहे”, असे या पक्षप्रवेशावेळी म्हणाले. तसेच या लोकसभा निवडणुकीत भाजपा ३७० पेक्षा जास्त आणि एनडीए ४०० पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. साध्ये देशभरात अनेक ठिकाणी अनेक आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक आणि अन्य नेते भाजपामध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत. ‘इंडिया’ आघाडीतील नितीश कुमार यांचा पक्ष देखील पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाला आहे.
जसजशा लोकसभा निवडणूक जवळ येत आहेत. तसतसे देशाच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसून येत आहे. भाजपा महाविजय अंतर्गत तर काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रेद्वारे जास्तीत जास्त मतदारांना आपल्याकडे आणायचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर आज मोठ्या संख्येने माजी आमदार आणि खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दक्षिणेत व तामिळनाडूमध्ये भाजपाची ताकद वाढल्याचे चित्र आहे. मोठ्या संख्येने माजी आमदार आणि खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश दक्षिणेतील पक्षाची वाढती विश्वासार्हता दर्शवते. यावेळी केंद्रीय मंत्री राजीव चंदशेखर यांनी आनंद व्यक्त करत लोकसभा निवडणुकीत भाजप 370 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी पक्षातील सर्व नेत्यांचे जंगी स्वागत केले.