आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर उत्तर दिले. यावेळी राज्यसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर निशाणा साधला. तसेच राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले, विरोधक माझा किंवा जनतेचा आवाज दाबू शकत नाहीत. दरम्यान, लोकसभेत बोलताना देखील त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. काँग्रेस ”विचारांच्या बाबतीत जुनी आहे आणि म्हणूनच त्यांनी आपले काम म आउटसोर्स केले आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”एक गोष्टीचा आनंद आहे की, खर्गेंनी ४०० जागांसाठी एनडीएला आशीर्वाद दिला आहे. आपला आशीर्वाद मेरे सर आँखो पर. मल्लिकार्जुन खर्गे केलेल्या टिपण्णीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ”अब की बार ४०० पार” या निवडणूक घोषणेचा संदर्भ दिला होता. सध्या असलेल्या ३३० ते ३३४ जागांच्या बहुमतासह यावेळेस ते … ४०० च्या वर असतील” असे खर्गे म्हणाले होते.
तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाचे खासदार निवडून आले आणि सत्ताधारी पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत १०० जागा देखील जिंकणार नाही, असे खर्गे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रदीर्घ भाषणाची खिल्ली उडवली. ‘ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा’ या लोकप्रिय बॉलीवूड गाण्याच्या ओळी देखील त्यांनी यावेळी वापरल्या.
”मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेत बराच वेळ बोलत होते. मी बराच वेळ विचार केला की, त्यांना एवढा बोलण्याची संधी कशी मिळाली? मग मला समजले की खास दोन कमांडर येथे नव्हते, याचा फायदा त्यांनी घेतला. म्हणून मला वाटते की, ‘ऐसा मौका फिर कहा मिलेगा…’ हे गाणे खर्गेजींनी ऐकले असेलच”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.