निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. यामुले शरद पवार गटाला मोठा धक्का समजला जात आहे. तसेच या निर्णयाविरुद्ध शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. दरम्यान राज्यसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ असे नाव दिले आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित दादांकडे आल्याने शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काल पुण्यात देखील राष्ट्रवादीच्या कार्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना आंदोलन केले.
दरम्यान पक्ष नि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे आल्याने अजित पवार गट आता राज्यतील कार्यालयांवर आपला दावा सांगण्याची शक्यता आहे. तसेच पुण्यातल्या कार्यालयावरही अजित पवार गट दावा करण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवार गट व शरद पवार गट आमने- सामने येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कार्यालय नक्की कोणत्या गटाला मिळणार, त्यासाठी कायदेशीर लढाई लढली जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने येण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव बहाल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावे मागवली होती त्यांपैकी हे एक नाव आहे. त्यानुसार, निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असे असणार आहे. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंतच्या काळापुरते मर्यादित असणार आहे.