प्रभू श्री रामचंद्राचे भव्य मंदिर अयोद्धेत सर्वसामान्यांकरिता खुले झाले असून भाविक हजारोंच्या संख्येने दर्शन घेत आहेत. प्रभु श्री रामचंद्रांच्या भव्य मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना त्याला निमंत्रणाची आवश्यता नव्हती. या कार्यक्रमात सर्वांधिक अडथळे आणण्याचे काम काँग्रेसने केले. रामभक्तांचा अपमान केला. त्यांना न्यायालयात खेचले. न्यायालयात खटला सुरू असताना सरकारची बाजू मांडण्यास उपस्थित नव्हते. पणं अन्सारी नावाचे गृहस्थ त्याठिकाणी उपस्थित झाले. ‘जो नही है राम का वह नही किसी काम का’ असे सांगत भाजपचे खासदार डाँ.अनिल बोंडे यांनी काँग्रेवर जोरदार टिका केली.
दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. दरम्यान राज्यसभेत अंतरिम बजेटबाबत चर्चा सुरू असताना अनिल बोंडे हे बोलत होते. सेवा सुशासन अन् गरिब कल्याणातून राष्ट्राच्या विकासाचे, उन्नतीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांचा न भुतो न भविष्यती विकास केला. अनेकदा बजेटमध्ये भविष्याचा विचार केला जात नाही. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्टी ठेऊन बजेट आकाराला आला आहे. सर्वांना याचा चांगला फायदा होत आहे.
राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर सुर्योदय योजनेची प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली. त्यातून 1 करोड घरांवर मोफत सोलर पॅनल बसविले जाणार आहे. विजनिर्मितीसोबत रोजगार प्राप्त होईल. काँग्रेसचे पदाधिकारी गावागावात जावून निवडणूकीचा प्रचार करतात. तेव्हा नागरिक त्यांना विचारत आहेत, 70 वर्षांत तुम्ही काय केले. त्या तुलनेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत घर दिले, नळाद्वारे पाण्याची सोय करून दिली, उज्वला गॅस योजनेतून गॅसची जोडणी दिली. आता घराच्या वर वीज वाचविण्यासाठी सौरउर्जेचे पॅनलही बसविले जात आहे. शाश्वत विकासच्या दिशेने भारताचे वाटचाल होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.