मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अमिताभ बच्चन कडक सुरक्षेत मंदिरातून बाहेर पडताना दिसत आहेत. यावेळी बिग बी यांनी पांढरा कुर्ता पायजमा घातला होता.
22 जानेवारीला अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात त्यांनी विधिवत सहभाग घेतला होता. तर आज 19 दिवसांनी बिग बी पुन्हा अयोध्येला पोहोचले आहेत. कडक बंदोबस्तात ते राम मंदिरात पोहोचले आणि त्यांनी रामलल्लाची पूजा केली. यावेळी अमिताभ बच्चन यांचे मुख्य आचार्य सत्येंद्र दास यांनी स्वागत केले.
रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी विभागीय आयुक्तांचे निवासस्थान गाठले. तर काही वेळाने ते ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनासाठी पोहोचतील. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या काही दिवस आधी अयोध्येत जमीन खरेदी केली आहे. या जमिनीबाबत पुष्टी करताना, अयोध्या रजिस्ट्रार शांती भूषण चौबे यांनी एएनआयला सांगितले की, “त्याच कराराचा भाग म्हणून, दोन कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. हा 10,000 चौरस फुटांचा भूखंड आहे ज्यासाठी 9 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. तसेच अमिताभ बच्चन यांनी खरेदीचा करार केला असून त्यांचे वकील राजेश यादव यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे.”
दरम्यान, चित्रपटाच्या आघाडीवर, बिग बी दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासोबत ‘कल्की 2898 एडी’ या साय-फाय ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट ९ मे रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.
दरम्यान, लवकरच बिग बी दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासोबत ‘कल्की 2898 एडी’ या साय-फाय ॲक्शन थ्रिलरमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट 9 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कमल हसन आणि दिशा पटानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.