राज्यात काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी देखील ठाकरे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनांवरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे.
काल (8 फेब्रुवारी) दहिसरमध्ये धक्कादायक घटना घडली. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याबाबतीत बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” हे अतिशय गंभीर आहे. एकूणच या प्रकाराला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नाही. ही घटना देखील गंभीर असली तरी देखील, अगदी २०२४ मध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस असतील किंवा अभिषेक घोसाळकर असतील, यांची एकत्रित पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळाली आहेत. कोणत्या विषयावर त्यांचा बेबनाव झाला की त्या मॉरिसने घोसाळकरांना गोळ्या मारल्या. स्वतःही स्वतःला गोळ्या मारून घेतल्या. याची चौकशी सुरु आहे. अनेक गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत, योग्य वेळी त्या समोर आणल्या जातील. अशा गंभीर घटनेचे राजकारण करणे योग्य नाही. माझ्यावर होत असलेले आरोप हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत. आणि आता तर विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी त्या ठिकाणी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील.”
काल (8 फेब्रुवारी) दहिसरमध्ये धक्कादायक घटना घडली. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे.अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटात असलेले विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. आधी अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले आणि लाईव्ह संपताच त्याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:ला डोक्यात गोळी घालून आपले जीवन संपवले.