भारतरत्न पुरस्कारांची घोषणा
भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणाऱ्या भारतरत्न पुरस्कारांची घोषणा झाली आहे. माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, डॉ. एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या शोषलं मीडियावर याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते , माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी याना देखील भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
उत्तराखंड राज्यातील हलदखनी येथे हिंसाचाराची घटना घडली आहे. या परिसरातील एक अनधिकृत मदरसा व मशीद तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी पोलीस बंदोबस्तात पोहोचले. मात्र कारवाई सुरु करण्यापूर्वीच त्यांच्यावर सर्व बाजूनी दगडफेक करण्यास सुरुवात झाली. या घटनेमध्ये पोलीस व अधिकारी कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी उच्च स्तरीय बैठक घेत घटनेचा आढावा घेतला. तसेच दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तणावग्रस्त भागात कर्फ्यू लावण्यात आला असून, निमलष्करी दल देखील तैनात करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी लगावला विरोधकांना टोला
काल दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. संजय राऊत, सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असून, एखाद्या गाडीखाली श्वान जरी आले तरी हे लोक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील असा जोरदार टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे.
देशात तिसऱ्यांदा येणार मोदी सरकार
इंडिया टुडे मूड ऑफ द नेशन यांच्या सर्व्हेनुसार जर का आज देशात लोकसभा निवडणूक झाली तर देशात एनडीएला ३३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ते इंडिया आघाडी १६६ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच बहुमतासाठी लागणार २७२ चा एकदा एनडीए सहज पार करताना दिसून येत आहे. यामुळे यंदा अब कि बार ४०० पार हा नारा किंवा हा आकडा गाठण्यात एनडीए मागे पडताना या सर्व्हेतून दिसत आहे. केंद्रात भाजपाचे सरकार येऊ नये म्हणून देशातील विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. मात्र यातील अनेक पक्ष स्वबळावरच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील देशातील जनता पुन्हा एकदा एनडीए कडे देशाची सत्ता सोपविण्याची शक्यता आहे.