पुण्यात आज निर्भय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण आहे. मात्र, ही सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निखिल वागळे यांच्याविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे यांचे पुण्यात भाषण होऊ देणार नाही कायदा आणि सुव्यवस्था रखाण्यासाठी पोलिसांनी सदर भाषणाला परवानगी नाकारावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे पोलिसांकडे केली.