#ललितकलाकेंद्रपुणे
ललित कला केंद्र येथे झालेल्या नाटकातील हिंदू देवी देवतांच्या विटंबनेचा घटनाक्रम –
१) दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता ललित कला केंद्रातील काही विद्यार्थ्यांनी “जब वी मेट” हे नाटक सादर करण्यास सुरुवात झाली. नाटक सुरू होण्याआधी रंगमंचाच्या बाजूस लोखंडी सळ्या, दांडे व फावडे आणण्यात आले.
२) नाटकाच्या स्क्रिप्ट नुसार रामलीला हे नाटक सादर करताना बॅकस्टेजला कलाकारांमध्ये काय संवाद होतो हे दाखवण्याचा प्रयत्न होता.
३) जेव्हा कलाकार नाटक सादर करीत होते तेव्हा सीतेचे आणि लक्ष्मण यांचा संवाद हे अश्लील भाषेमध्ये दाखविण्यात आले. सीतेच्या हातात सिगारेट दाखविण्यात आली तर सीता रामाला शिव्या देतो, राखी सावंत अशी उपमा संवादामध्ये देते.
४) हे संताप जनक दृश्य बघून प्रेक्षकांमध्ये बसलेले विद्यार्थ्यांनी हे प्रक्षोभक नाटक बंद करा ह्यातून समस्त भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा अपमान होतोय असे म्हणत ते नाटक थांबविण्याचा प्रयत्न केला जेणेकरून अजून विटंबना होणार नाही.
५) विद्यार्थी नाटक बंद करण्यासाठी गेले असता पूर्वतयारीत असलेल्या डाव्या संघटनेतील कार्यकर्त्यांनी लोखंडी सळ्या, दांडे व फावडे घेऊन त्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी सामान्य विद्यार्थी व तिथे उपस्थित असलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्याला हात देखील लावला नाही. मारहाण तर दूरच राहिली .जर ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांना मारहाण झाली होती, असं ते म्हणतात तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार का दिली नाही किंवा त्याचा एक तरी पुरावा त्यांच्याकडे आहे का??
६) ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने तक्रारदारांची तक्रार घेत आयोजकांवर गुन्हा दाखल करीत तत्काळ आरोपींना अटक केली.
७) ह्या सर्व प्रकरणावर “अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा” असा narrative (विमर्श) काही बुद्धिजीवी करताना दिसत आहेत.
८) मुळात नाटकाच्या आधी लोखंडी सळ्या, लाकडी दांडके आणणे ही कुठली अभिव्यक्ती आहे ? एखाद्या धर्माचे श्रद्धा स्थान असलेल्या देवी देवतांची विटंबना करणे हे कुठले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे?? असा सवाल यावेळ उपस्थित होतो.
९) आयोजकांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही बॅकस्टेजला कलाकार कसे राहतात हेच दाखवायचे होते तर मग राम सीतेचे वेश परिधान करून व त्यांच्या नावाचा वापर करून तुम्हाला काय सिद्ध करायचे होते? असा उल्लेख करण्यामागे काय हेतू होता ? ह्याला अभिव्यक्ती म्हणायची का ?
१०) पुणे विद्यापीठ शैक्षणिक कॅम्पस आहे. ह्यामध्ये सिगारेट , दारू इ. व्यसने वर्ज्य असताना सुद्धा ओपन थिएटर मध्ये नाटकाचाच भाग म्हणून का होईना सिगारेट ओढणे, ही कुठली अभिव्यक्ती आहे ? आज अभिव्यक्तीच्या नावाने शैक्षणिक परिसरात सिगारेट ओढलीत उद्या दारू प्याल आणि सांगाल अभिव्यक्ती आहे म्हणून..
११) प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या धर्तीवरच अशा कार्यक्रमांचे आयोजन का होते ?
१२) ज्या नाटकाचा तुम्ही विडंबन म्हणून उल्लेख केलात. त्याला शुद्ध भाषेत विटंबना असे म्हणतात..
१३) धार्मिक भावना दुखावणे, शैक्षणिक संकुलात व्यसन करणे हा भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा आहे. हे HOD प्रा .प्रवीण भोळे ह्यांना माहित नव्हते का ? हे गुन्हे करून कुठली अभिव्यक्ती सांगतायत ? प्रभू श्रीराम व सीतामाता यांची विटंबना करणारे वाक्य हे त्या स्क्रिप्ट मध्येच लिहिलेले आहे. मुळात स्क्रिप्टच आक्षेपार्य आहे.
सौजन्य- विश्व संवाद केंद्र,पुणे