रतन टाटा हे भारतातील एक यशस्वी उद्योजक आहेत. रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत. टाटा समूह सतत समाजाच्या कल्याणासाठी कार्य करत असते. करोना काळात देखील टाटा समूहाने अनेक प्रकारची मदत केलेली आपल्याला पाहायला मिळाली. सामाजिक कामांमध्ये टाटा अनेक प्रकारे सहयोग देत असतो. त्यातच आता टाटा समूहाने आणखी एक सामाजिक कार्य केले आहे. समाजाला, समाजातील घटकांना फायदेशीर असे एक महत्वाचे कार्य रतन टाटा यांनी केले आहे. रतन टाटा यांनी प्राण्यांसाठी एक रुग्णालय उभे केले आहे. तब्बल १६५ कोटी रुपये खर्च करून हे प्राण्यांसाठीचे रुग्णालय उभे करण्यात आले आहे.
देशातील प्रसिद्ध अणि मोठ्या उद्योगपतींपैकी एक असणाऱ्या रतन टाटांनी आपले आणखी एक स्वप्न पूर्ण केले आहे. सामाजिक कार्यांमध्ये कायमच आपण टाटा समूहाचा सहभाग असल्याचे पाहिले आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलने कोट्यवधी लोकांना कमी खर्चात कॅन्सरशी लढण्यास मदत केली आहे. त्याच आधारावर १६५ कोटी रुपये खर्च करून टाटा समूहाने प्राण्यांसाठी रुग्णालय बांधले आहे. हे रुग्णालय २४ तास सुरु राहणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे रुग्णालय सुरु होणार आहे.
टाटा समूहांचे लहान प्राण्यांचे रुग्णालय मुंबईत सुरु होणार आहे. कुत्रा, मांजर आणि अन्य लहान प्राण्यांची शुश्रूषा करण्यासाठी या रुग्णालयाची बांधणी करण्यात आली आहे. प्राणी देखील आपल्या कुटूंबाचा एक भाग असल्याचे मला वाटते. त्यामुळे मला या रुग्णालयाची गरज आहे असे वाटले. माझे स्वप्न पूर्ण होत आहे याचा मला आनंद असल्याचे रतन टाटा म्हणाले.