बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांची शनिवारी शूटिंगदरम्यान अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी अचानक छातीत दुखू लागल्याची तक्रार केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम त्यांचा एमआरआय रुग्णालयात करण्यात आला.
अभिनेता सोहम चक्रवर्ती निर्मित ‘शास्त्री’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मिथुन चक्रवर्तीला छातीत दुखू लागले. तृणमूल आमदार कम अभिनेता सोहमने त्यांना विलंब न करता रुग्णालयात नेले.
अद्याप मिथुन यांच्या कुटुंबियांकडून अथवा रुग्णालयाकडून मिथुन यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. दरम्यान मिथुनदा बरे व्हावेत म्हणून त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.