केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत अयोध्येच्या राम मंदिरावर निवेदन केले भाजपने जो शब्द दिला होता तो पाळला असून शेकडो वर्षांच्या तपस्येला फळ मिळाल्याच्या भावना व्यक्त करत दुसरीकडे त्यांनी राम मंदिरावरुन सरकारवर टीका करणाऱ्यांना सुनावत म्हंटले की, राम मंदिर हा चेतनेचा विषय आहे. देशवासियांच्या या आनंदात सगळ्यांनी सहभागी झाले पाहिजे. हवन में हड्डी नहीं डालनी चाहीए’ यातच तुमचे भले आहे असे म्हणत विरोधकांना त्यांनी कडक शब्दात इशारा दिला.
अमित शाह आपल्या भाषणाची सुरवात करताना म्हणाले की, आज मला कोणालाच उत्तर देण्याची गरज नाही, आज मला माझ्या भावना आणि देशातील जनतेचा आवाज सभागृहात मांडायचा आहे. जो आवाज न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये वर्षानुवर्षे दडपला गेला होता. , नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तो आवाज आणि अभिव्यक्तीही सापडली. 22 जानेवारी बद्दल काही लोक काहीही म्हणत असले तरी हा दिवस 10 हजार वर्षांहून अधिक काळ स्मरणात राहील. 1528 पासून सुरू असलेल्या न्यायाच्या लढ्याचा 22 जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. हजारो लोक गेले, अनेक पिढ्या निघून गेल्या, पण त्यांना राम मंदिर उभारणीचा दिवस पाहता आला नाही. आम्ही खूप भाग्यवान आहोत
.”सुमारे 500-550 वर्षांपासून, या देशातील लोकांचा असा विश्वास आहे की राम मंदिर जेथे प्रभू राम होते तेथेच बांधले पाहिजे… तेथे अनेक आंदोलने झाली आणि तुष्टीकरणामुळे ते अडवले गेले. जेव्हा निकाल येणार होता तेव्हा बरेच लोक म्हणाले. दंगली होतील. पण जेव्हा निकाल आला तेव्हा दंगल किंवा मोर्चे नव्हते,”
“आता हा ऐतिहासिक दिवस आला आहे आणि सर्व काही धर्मग्रंथानुसार व्हावे यासाठी पंतप्रधानांनी स्वतः 12 दिवसांचे उपोषण केले. अशी भक्ती मी कधीच पाहिली नाही. आज प्रत्येकाच्या मनात सारखीच भक्ती आहे आणि मंदिराचे दर्शनही एका भावनेने झाले आहे. . जेव्हा संपूर्ण देश आनंदात असतो, आणि संसदेनेही आनंद साजरा केला पाहिजे आणि काँग्रेसनेही त्यात सामील व्हायला हवे,” असे शहा यांनी ठामपणे सांगितले.
22 जानेवारीला अभिजीत मुहूर्तावर देशाची इच्छा पूर्ण झाली.हा दिवस देशाला विश्वगुरूच्या दिशेने नेणारा दिवस आहे. जे लोक रामाशिवाय देशाची कल्पना करतात ते देशाला ओळखत नाहीत, रामराज्य हे एका विशेष धर्मासाठी नाही तर ते देशासाठी आवश्यक असल्याचे आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले आहेत.