उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आळंदीत जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता-भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत येण्याची इच्छा पूर्ण झाली, अशा भावना व्यक्त केल्या.
आळंदीत सुरू असलेल्या गीता-भक्ती अमृत महोत्सवामध्ये योगी आदित्यनाथ यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरे टोप घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला योगी आदित्यनाथ यांच्यासह बाबा रामदेव, श्री. श्री. गोविंद महाराज, चंद्रकांत पाटील आदी उपस्थि होते.
यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी मी लहान असताना वाचली होती. तेव्हापासून माझी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत येण्याची लहानपणापासून इच्छा होती. ती इच्छा आज पूर्ण झाली. मला आज पावन आळंदी भूमीत येण्याचे सौभाग्य लाभले. सनातान धर्मासाठी मी काम करत आलो आहे. तसेच आज मी ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमील नतमस्तक करतो.
महाराष्ट्रात एकाच कुटुंबात 4 संत होऊन गेले. आपल्याला त्यांचा आशीर्वाद शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामींनी घडवले. त्यांनी औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान दिले. तसेच औरंगजेबाला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबाला कोणीही विचारले नाही. त्यामुळे महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण येथे संतांचे सान्निध्य आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.