पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड शरह मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रूग्णालयातून फरार झाला आहे. पोलिसांना चकवा देत आरोपीने ससून रूग्णालयातून पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांना सोशल मीडियावरून रील्स आणि कमेंट करून एका व्यक्तीने धमक्या दिल्या होत्या. धमक्या देणाऱ्या या आरोपीचे नाव मार्शल लुईस लीलाकर असे आहे. स्वाती मोहोळ यांना धमकावल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी लीलाकरला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती.
आरोपी लीलाकरला प्रकृती खराब असल्याच्या कारणाने येरवडा जेलमधून ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी लीलाकरने पोलिसांना चकवा देत हॉस्पिटलमधून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आरोपी लीलाकर फरार झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 8 पथके पाठवली आहेत. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.