बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. विद्युत जामवाल हा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तसेच आता विद्युत एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. विद्युतला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
विद्युत जामवालचा ‘क्रॅक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या तो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या प्रमोशनदरम्यान विद्युतने सार्वजनिक ठिकाणी धोकादायक स्टंट केल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
विद्युत जामवालचे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (RPF) वांद्रे कार्यालयातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये विद्युत जामवाल पोलीस स्थानकात एका खूर्चीवर बसलेला दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत जामवालने धोकादायक स्टंट केल्याच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पण अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, विद्युत जामवाल हा चित्रपटांमध्ये धोकादायक स्टंट करताना दिसतो. त्याने आत्तापर्यंत चित्रपटांमध्ये धोकादायक स्टंट करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण आज याच स्टंटमुळे विद्युत जामवाल अडचणीत सापडला आहे.