बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली. नितीश कुमार यांनी महागठबंधनची साथ सोडून एनडीएला जवळ केले. एनडीए सोबत एकत्र येऊन त्यांनी बिहारमध्ये सरकार स्थापन केले. नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र आज त्यांची अग्निपरीक्षा आहे. कारण बिहार विधानसभेत त्यांना आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र बहुमत चाचणी होण्याआधी बिहारमध्ये काही राजकीय नाट्य घडताना आपल्याला दिसत आहे. कारण राजदचे आमदार चेतन आनंद यांच्या बंधूने यांनी माझ्या भावाला घरात डांबून ठेवले आहे अशी तक्रार केली होती. त्यावरून बिहार पोलिसांनी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाला भेट देत चौकशी केली .
चेतन आनंद यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार तपासासाठी पोलीस तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सध्या राजदचे सर्व आमदार तेजस्वी यादव यांच्या घरी आहेत. मात्र पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. बहुमत चाचणीपूर्वी बिहारमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नितीश कुमार भाजपासोबत गेले असले तरी काही आमदार हे तेजस्वी यादव यांना साथ देतील अशी चर्चा बिहारमध्ये आहे.
काल नितीश कुमार आणि जदयू दलाची विधीमंडळाची बैठक झाली. त्यात अनेक आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे नितीश कुमारांचे टेन्शन वाढले आहे. जर का उपस्थित नसलेल्या आमदारांनी तेजस्वी यादव यांना साथ दिली तर नितीश कुमारांचे सरकार कोसळते की काय अशा चर्चाना बिहारमध्ये उधाण आले आहे. थोड्याच वेळात जदयूच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यामुळे बैठकीला किती जण उपस्थित राहतात ते पाहणे आवश्यक आहे. तसेच जितनराम मांझी हे नितीश कुमारांना साथ देण्यासाठी म्हटले जात आहे.