गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस ओटीटी-2 चा विजेता एल्विश यादव चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एल्विश यादव रेव्ह पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आला होता. तसेच त्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता एल्विशचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
एल्विश यादवचा जयपूरमधील एका रेस्टॉरंटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हि़डीओमध्ये एल्विश एका व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसत आहे.
रेस्टॉरंटमध्ये जात असताना एल्विश एका व्यक्तीला पाहून थांबतो, नंतर त्या व्यक्तीकडे जातो आणि त्याच्या कानशिलात लगावतो. यावेळी या घटनेचे कारण समजण्यासाठी पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचतात. सध्या एल्विशचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर एल्विशने स्वत: स्पष्टीकरण दिले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओवर एल्विश म्हणाला की, मुद्दा असा आहे की मला भांडण करायला आवडत नाही. तसेच काहीही झाले की मला हात वर करण्याचा शौक नाही. मी सर्वांसोबत नॉर्मल वागतो. ज्याला माझ्यासोबत फोटो काढायचो असतो त्याच्यासोबत मी फोटो काढतो. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तिथे पोलीस आणि कमांडो देखील आहेत. मला आई-बहिणीवरून कोणी शिवीगाळ केली तर त्याला मी सोडणार नाही. त्या व्यक्तीने मला शिवी दिली म्हणून मी त्याला जाऊन मारले. त्याने शिवीगाळ केली तेव्हा मी त्याला मारले. ही माझी स्वत:ची स्टाईल आहे. मी असाच आहे. तो तोंडाने बोलतो पण भाऊ मी तोंडाने बोलू शकत नाही, असे स्पष्टीकरण एल्विशने दिले आहे.