माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहेत. ते काँग्रेस पक्षात नाराज असून त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. तसेच अशोक चव्हाण हे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटील पोहोचल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अशोक चव्हाण हे राजीनामा देण्यासाठीच राहुल नार्वेकरांच्या भेटीला पोहोचले होते, असे म्हटले जात आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसचा एक नेता फुटणार अशा चर्चा सुरू होत्या. अशातच आता अशोक चव्हाण हे पक्षात नाराज असून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल आहेत. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहेत.
आगामी राज्यसभा निवडणकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी भावी खासदार असा उल्लेख करत त्यांचे स्टेटस ठेवले आहेत.