बिहारमध्ये गेल्या महिन्या मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. महागठबंधनची साथ सोडून नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीए जवळ आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर नितीश कुमार यांची आज अग्निपरीक्षा होती. नितीश कुमार यांच्या सरकारला आज बहुमत सिद्ध करायचे होते. त्याआधीच काही आमदार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये नितीश कुमार यांचीच सत्ता राहणार आहे.
विश्वासदर्शक ठराव नितीश कुमार यांनी जिंकला असून, नितीश कुमारांच्या बाजूने १२९ मते पडली. तसेच विरोधकांनी सभागृहाचा त्याग केल्याने त्यांच्या बाजूने मते पडली नाहीत. बिहार विधानसभेत एकूण २४३ सदस्यांचे संख्याबळ आहे. दरम्यान, बहुमतासाठी १२२ आमदारांची गरज लागते. विरोधकांनी सभात्याग करू नये अशी विनंती नितीश कुमारांनी केली. त्यामुळे कोणाकडे किती आमदार आहे ते कळले. विरोधकांकडे सगळे मिळून आता ११४ आमदारांचे संख्याबळ आहे.
बहुमत चाचणीआधी काय घडले ?
राजदचे आमदार चेतन आनंद यांच्या बंधूने यांनी माझ्या भावाला घरात डांबून ठेवले आहे अशी तक्रार केली होती. त्यावरून बिहार पोलिसांनी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानावर धडक दिली. तसेच काल नितीश कुमार आणि जदयू दलाची विधीमंडळाची बैठक झाली. त्यात अनेक आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे नितीश कुमारांचे टेन्शन वाढले आहे. जर का उपस्थित नसलेल्या आमदारांनी तेजस्वी यादव यांना साथ दिली तर नितीश कुमारांचे सरकार कोसळते की काय अशा चर्चाना बिहारमध्ये उधाण आले आहे. थोड्याच वेळात जदयूच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यामुळे बैठकीला किती जण उपस्थित राहतात ते पाहणे आवश्यक आहे. तसेच जितनराम मांझी हे नितीश कुमारांना साथ देण्यासाठी म्हटले जात आहे.