कुख्यात गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने १७ फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे. गणेश मारणे व विठ्ठल शेलार हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. आता या दोघांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. शरद मोहोळ खून प्रकरणात माजी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सर्व आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शरद मोहोळ यांच्या गोळीबार झाल्यानंतर उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला होता.
नक्की काय होती घटना ?
जानेवारी महिन्याच्या ५ तारखेला कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची भरदिवसा गोळ्या घालू हत्या करण्यात आली होती. त्या दिवशी शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस होता. भरदिवसा पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये ही घटना घडली होती. हल्ल्यानंतर शरद मोहोळ याला खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यायत आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. मात्र या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.मात्र त्याचा अर्ज नायालयाने फेटाळून लावला. आता या सर्व आरोपींना १७ फेब्रुवारी पर्यंत मोक्का कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला होता. आरोपींना पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर यामध्ये विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी आयुक्त रितेश कुमार यांच्याजडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर सर्व प्रकारची पडताळणी करून आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपींवर मोक्का लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता सर्व आरोपींवर मोक्का कोठडी सुनावण्यात आली आहे.