आज मुंबईतील भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते, माजी आमदार अशोक चव्हाण यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. हा पूर्णपणे माझा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. यावेळी माध्यमांसवि संवाद साधताना त्यांच्याकडून मुंबई भाजपचे अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा उल्लेख झाला.
अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केला आहे.दरम्यान प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधताना ते म्हणाले, ”महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष” असे चव्हाण म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांची चूक सुधारली. दरम्यान ५० वर्षांची सवय असल्याने असे झाले. मात्र लगेचच अशोक चव्हाण यांनी आपली चूक सुधारत पुढील मुद्द्यांवर बोलण्यास सुरुवात केली.
अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभा उमेदवारी मिळणार?
अशोक चव्हाण आज भाजपामध्ये रीतसर प्रवेश करणार आहेत. दरम्यान भाजपाकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेच भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. अशोक चव्हाण यांच्या रूपाने महायुतीने राज्यसभेसाठी ६ वा उमेदवार उभा केल्यास अशोक चव्हाण गटातील काँग्रेस आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.