उल्हासनगरमध्ये शिंद गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी आता आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह पाच जणांना अटक केली होती. तर आज (14 फेब्रुवारी) त्यांची पोलीस कोठडी संपली. त्यानंतर आज त्यांना न्यायलयात हजर करण्यात आले होते. यावेळी गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींचा एमसीआर काढण्यात आला. तसेच कोर्टाने गणपत गायकवाडांसह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आज सकाळी गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना पोलिसांनी उल्हासनगर चोपडा कार्टात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयीन परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तेथे दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील जमले होते.
न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी पोलिसांनी असा युक्तीवाद केला होता की त्यांना 11 दिवसांची कोठडी मिळाली आहे, आणखी 2 दिवसांची कोठडी मिळण्यासाठी पोलिसांन युक्तीवाद केला. त्यानंतर दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.