जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी २५०० सीआरपीएफ जवानांचा ताफा जम्मू-श्रीनगर मार्गावरून जात होता. तेवढ्यात समोरून येणारी एक कार सीआरपीएच्या ताफ्यात असणाऱ्या वाहनावर येऊन धडकली. कार ताफ्यातील वाहनाला धडकताच एक प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटात भारतमातेचे ४० वीर जवान शहीद झाले. आज या भ्याड हल्ल्याला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. संपूर्ण देशभर शहिदांना वाहिली जात आहे.
हा भ्याड हल्ला इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला की, सॉफ्ट झाल्यानंतर त्या भागात केवळ धुळीचे साम्राज्य होते. खूप वेळ तिथे काही दिसत नव्हते. मात्र नंतरची परिस्थिती वेगळी होती. तेव्हाचे दृश्य पाहून संपूर्ण देश रडला होता. पाकिस्तानमधील जैश ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात होता. मात्र या हल्ल्याचा भारताने देखील बदल घेतला. भारताने बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करून अनेक दहशतवादी पॅड्स नष्ट केले होते. ३०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
१४ फेब्रुवारी २०१९ मध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या जवानांनावर भ्याड हल्ला केला. ७८ बसेसमधून चाललेल्या २५०० जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केल्याने त्यात आपले ४० शूर जवान शहीद झाले. मात्र भारताने देखील याचा बदला घेतला. अवघ्या १२ दिवसांत ‘नापाक’ पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला करून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. यामध्ये भारताने ३०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.