राज्यसभेसाठी २७ फेब्रुवारी ५६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये ६ जागांसाठी महाराष्ट्रातून निवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेना,काँग्रेस आणि भाजपाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारी राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. भाजपाने देखील आज आपल्या ३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कालच भाजपात पक्ष प्रवेश केले अशोक चव्हाण, डॉ. मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केले आहे. त्यातील डॉ. अजित गोपछडे हे पक्षाच्या संघटनेत महत्वाच्या पदावर कार्यरत होते. डॉ. अजित गोपछडे हे नक्की कोण आहे आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेऊयात.
डॉ. अजित गोपछडे हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे. गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले स्वयंसेवक आहेत. तसेच भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे संयोजकदेखील आहेत. ते पेशाने डॉक्टर आहेत. अजित गोपछडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले स्वयंसेवक असून, ते पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यांना यावेळेला भाजपाने राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड विधानसभा आणि लोकसभेसाठी त्यांचे नाव कायमच चर्चेत असायचे.
कॉलजेला असताना डॉ. अजित गोपछडे यांनी प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले. डॉ. अजित गोपछडे हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पक्षामध्ये काम करताना त्यांनी डॉक्टरांचे संघटन मजबूत करण्यातला कार्य केले आहे. अजूनही त्यासाठी समाजपयोगी कार्य ते करत आहे.