मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरूवात केली आहे. सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. आज त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. तसेच मनोज जरांगेंची प्रकृती आता खालावली आहे. अशातच आता मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला मराठा आरक्षणासाठी धारेवर धरा. मुंबईत मी एकटा जाऊन बसेन.
मला झोपेत सलाईन लावले. पण जरी मी मेलो तरी मला सरकारच्या दारात नेऊन टाका. तसेच मला सलाईन लावायचे असेल तर अगोदर आरक्षणाची अंमलबजावणी कधी करता ते सांगा, असेही मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. तसेच मनोज जरांगेंची प्रकृती आता खालावली आहे. अन्न, पाणी, औषधे न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. नाकातून रक्तस्त्राव होत असताना देखील मनोज जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.