राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज ही घोषणा केली. येत्या २७ तारखेला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. १५ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्यामुळे आज अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने देखील आज मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे व अशोक चव्हाण यांच्या नावाची घोषणा आजच केली. तर शिवसेनेने देखील मिलिंद देवरा यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.