उमेदवारांनी भरले राज्यसभेचे अर्ज
काल सर्वच पक्षांनी आपापल्या राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी विधिमंडळ सचिवांकडे आपले अर्ज दाखल केले आहेत. महायुतीमध्ये भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकरांनी, डॉ. अजित गोपछडे , शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांना तर काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. २७ तारखेला राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच सर्व उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल आपल्या पक्षातील नेत्यांचे आभार मानले आहेत.
आंदोलक शेतकरी-सरकारमध्ये आज बैठक
पुढील घडामोड आहे दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाची. आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाब हरियाणातील शेतकरी हे आंदोलन करत आहे. आंदोलनचा भाग म्हणून त्यांनी दिल्लीकडे कूच केलय. दरम्यान सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये आज बैठक होणार आहे. या बैठकीत काही तोडगा निघतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बैठक होईपर्यंत पुढे न जाण्याचा निर्णय आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पॅरामिलिट्री फोर्सेस तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान दिल्ली हाय कोर्टातील रजिस्ट्रारला दिल्लीत बॉम्ब स्फोट करण्याच्या धमकीचा एक ईमेल प्राप्त झाला. यात मी दिल्लीवर सर्वात मोठा हल्ला करेन. हा दिल्लीतील सर्वात मोठा बॉम्ब स्फोट असेल. सर्व मंत्र्यांनी एकत्रित यावे मग आम्ही तुम्हाला एकत्रितपणे उडवून देऊ. केवढी सुरक्षा तैनात करायची तेवढी करावी असे यात लिहिण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, हायकोर्ट आणि महत्वाच्या भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच हा ईमेल कुठून आला याचा तपास करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर राहुल नार्वेकरांनी दिला निकाल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय त्यांनी दिला आहे. यामुळे हा निर्णय शरद पवार गटाला धक्का मानला जात आहे. तसेच राहुल नार्वेकरांनी अजित पवार गटाचे आणि शरद पवार गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. हा निर्णय देताना त्यांनी संख्याबळ लक्षात घेतले आहे. तसेच सचिवालयातील कागपत्रांचाही निर्णय घेताना विचार करण्यात आला आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे.