राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दैनिक ‘लोकमत’च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स या सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुलाखती दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. लोकसभा २०२४, महारष्ट्राचे व्हिजन, अजित पवार , विधानसभा निवडणूक आणि उद्धव ठाकरेंबद्दल देखील त्यांनी काही विधाने या मुलाखतीमध्ये केली. उद्धव ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांनी काय उत्तर दिले? ते पाहुयात.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दैनिक ‘लोकमत’च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स या सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे हे तुमच्यासोबत येतील का असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”उद्धवजी आमच्यासोबत येण्याची कुठलीही शक्यता नाही. याचे कारण असे आहे की, उद्धवजींनी आमच्याकरता त्यांची दारे बंद केली. प्रत्येकाचा पॉलिटिकल अजेंडा वेगळा असू शकतो. त्यात फरक असू शकतो. ते फरक दूर करून आपल्याला एकत्रित येत येते. मात्र इथे आमची परिस्थिती अशी आहे की, आमची मने दुखावली आहेत. ज्या प्रकारे त्यांचा व्यवहार राहिला आहे, ज्या प्रकारे पंतप्रधानांवर टीका करतात, ज्या खालच्या स्तरावर जाऊन ते बोलतात, या सर्व गोष्टींनी मने दुखावली आहेत. जिथे मने दुखावतात तिथे युती होत नाही. अशा वेळी एकत्रित येणे कठीण आहे. आमची मने दुरावलेली आहेत यात काही शंका नाही.”
राज्यात ४२ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकणार
लोकसभेसाठी राज्यातील किती जागा जिंकणार याबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता, मागच्या वेळेस माही ४२ जागा जिंकलो होतो, मात्र यावेळेस आम्ही ४२ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकू, मागच्या वेळपेक्षा कमी येणार नाहीत असा आमचा प्रयत्न असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देशात लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. काही सर्व्हेतून राज्यात महायुतीला ३९ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.