पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हरियाणाच्या रेवाडी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना अब की बार 400 पारचा या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला.आणि भारताला तिसरा सर्वात मोठा देश बनवण्यासाठी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी जनतेकडून आशीर्वाद मागितले.
“जी 20 शिखर परिषद यशस्वी झाली तर ते तुमच्या आशीर्वादामुळेच. भारताचा ध्वज चंद्रावर पोहोचला, गेल्या 10 वर्षात भारत 11व्या क्रमांकावरून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात येत्या काही वर्षांत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी जनतेला भाजपाला भरघोस मते द्यावीत असे आवाहन केले.
पीएम मोदी म्हणाले, “यावेळी एनडीएने 400 चा टप्पा पार केला आहे. या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या आपल्या आजच्या भेटीला विशेष महत्त्व आहे.
जानेवारीमध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या नवनिर्माण सोहळ्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, थोड्याच वेळापूर्वी मला रेवाडी एम्स, नवीन रेल्वे लाईन आणि मेट्रो लाईनसह 10,000 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प हरियाणाला हस्तांतरित करण्याची संधी मिळाली. भगवान रामाचे आशीर्वाद आहेत की, आजकाल मला सर्वत्र अशा पवित्र कार्यांशी जोडण्याची संधी मिळते आहे. .
आज पंतप्रधान मोदींनी हरियाणाच्या रेवाडीमध्ये 9750 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पंतप्रधान मोदींचा सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सीएम मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींची एक आठवण सांगितली, “जेव्हा तुम्ही (नरेंद्र मोदी} 2013 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते, आणि लोक मात्र तुम्हाला पंतप्रधानांच्या रूपात पाहू इच्छित होते तेव्हा रेवाडीतून तुम्ही तुमची प्रचार मोहीम सुरू केली होती आणि पंतप्रधानपद स्वीकारल्यामुळे लोकांची इच्छा प्रत्यक्षात आली होती.आज तुम्ही पुन्हा एकदा रेवाडीच्या लोकांची इच्छा आणि स्वप्न त्यांना एम्स (AIIMS) देऊन पूर्ण करत आहात”
गुरुग्राममधील “मेट्रो स्टेशन” प्रकल्प केवळ गुरुग्राम किंवा देशातील लोकांनाच नाही तर येथे गुंतवणूक करण्यासाठी आलेल्या परदेशी कंपन्यांनाही मदत करेल. गेल्या 10 वर्षांत तुम्ही आम्हाला ज्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे, त्यादरम्यानच्या आमच्या कामगिरीवर आणि विशेषतः रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर, आमच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास वाढला आहे. , असेही सीएम खट्टर म्हणाले आहेत