सेलंगोर ,मलेशिया इथे भारतीय महिला बॅडमिंटन संघाने शनिवारी रोमहर्षक उपांत्य फेरीत जपानचा 3-2 असा पराभव करत स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारतीय महिला किंवा पुरुष संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय संघाच्या विजयाची शिल्पकार ठरली अनमोल खारब जिने निर्णायक सामना जिंकला.तिने जपानच्या निदायरा नात्सुकीला २१-१४, २१-१८ अशा दोन सरळ गेममध्ये पराभूत करून शेवटचा गेम जिंकून भारताला अंतिम फेरीत नेले.
अंतिम फेरीत भारतीय महिला बॅडमिंटन संघाचा सामना थायलंडशी होणार आहे.
दोन दिवसापूर्वी ह्याच स्पर्धेत पीव्ही सिंधूने पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ 2 – 1 असा पिछाडीवर होता. महिला दुहेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत बरोबरी साधली. त्यानंतर चीनसारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारली ती 17 वर्षाच्या अनमोल खारबच होती.