दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने न्यूज क्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांनी हा आदेश दिला आहे. .
आज झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी दोघांची न्यायालयीन कोठडी 10 दिवसांनी वाढवण्याची मागणी केली मात्र न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडी 6 दिवसांनी वाढवण्याचे आदेश दिले. आज प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांची न्यायालयीन कोठडी संपत होती, त्यासाठी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. .
22 डिसेंबर 2023 रोजी न्यायालयाने दोघांनाही 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 22 डिसेंबर 2023 रोजीच न्यायालयाने यूएपीए अंतर्गत न्यूज क्लिकवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला 60 दिवसांचा अधिक वेळ दिला होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तपासासाठी आणखी ९० दिवस देण्याची मागणी केली होती.त्यानंतर पुन्हा एकदा 29 जानेवारी रोजी न्यायालयाने दोघांच्या न्यायालयीन कोठडीत आजपर्यंत वाढ केली होती.
दिल्ली पोलिसांनी 3 ऑक्टोबर 2023 रोजी पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांना अटक केली. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली. न्यू यॉर्क टाईम्समध्ये न्यूज क्लिकला चिनी प्रचारासाठी पैसे मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. बातमीनुसार, अमेरिकन करोडपती नेविल रॉय सिंघमने चिनी प्रचाराला चालना देण्यासाठी न्यूज क्लिकला पैसे दिले ह्या आरोपाखाली ]3 ऑक्टोबर 2023 रोजी या प्रकरणी अनेक पत्रकार, यूट्यूबर्स आणि व्यंगचित्रकारांच्या घरांवर छापे टाकण्यात आले होते. यानंतर दिल्ली पोलिसांनी ‘न्यूजक्लिक’ने परदेशातून निधी घेऊन चीनच्या समर्थनार्थ दुष्प्रचार केल्याचा आरोप ठेवत, दिल्ली पोलिसांनी संस्थापक-संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांच्याविरोधात ‘यूएपीए’अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. .त्यानंतर ९ जानेवारी रोजी न्यायालयाने अमित चक्रवर्ती यांना सरकारी साक्षीदार होण्यासाठी परवानगी दिली होती.