भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आणखी एक यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. इस्रोच्या नॉटी बॉय रॉकेटच्या मदतीने INSAT-3DS या उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात असून सायंकाळी पाच वाजून 35 मिनिटांनी हा उपग्रह लाँच करण्यात आला.
हा भारताचा सर्वात आधुनिक हवामान उपग्रह आहे. यामुळे हवामानाची आणि नैसर्गिक संकटांची अचूक माहिती मिळू शकणार आहे.
हे प्रक्षेपण झाल्यानंतर सुमारे 15 मिनिटांमध्ये इनसॅट-3DS हा उपग्रह आपल्या नियोजित कक्षेत पोहोचवण्यात आला. ज्याप्रमाणे अपेक्षा होती, त्याप्रमाणेच ही मोहीम पार पडली, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे .